
● शिवसेनेचे पश्चिम विदर्भावर लक्ष केंद्रित
Yavatmal News :
पश्चिम विदर्भातील आगामी महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांचा पश्चिम विदर्भ दौरा आहे. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Election strategy: MP Arvind Sawant’s Yavatmal visit
हा मेळावा येत्या शनिवार, 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता उत्सव मंगल कार्यालय, यवतमाळ येथे होणार आहे. निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, राजेंद्र गायकवाड, माजी आमदार श्रीकांत उर्फ बाळू मुनगिनवार, सागर पुरी, प्रविण शिंदे, किशोर इंगळे, संजय निखाडे, संतोष ढवळे, महिला आघाडीच्या सृष्टी वाघमारे, कल्पना दरवई, माया राणे, योगिता मोहोड, युवा सेनेचे अमोल धोपेकर, संकेत ठाकरे, विशाल पांडे, युवती सेनेच्या मंजुषा वानखडे, प्रगती कावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा संघटक, समन्वयक, प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शेतकरी सेना, अल्पसंख्यांक आघाडी तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा सचिव तुषार देशमुख यांनी केले आहे. सर्व उपजिल्हा, तालुका, शहरप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Rokhthok News






