● शिवजयंती निमित्य साकारला होता देखावा
Wani News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील शिवतिर्थावर छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यालगत भव्य देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात भगव्या रंगाचा झेंडा व त्यावर मनसेचे नांव व चिन्ह मुद्रीत केल्याचे आढळून आले. तर दोन लहान झेंडे लावण्यात आले होते त्यावर पक्षाचे नांव दिसून आल्याने आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Violation of code of conduct, case registered against MNS workers

शिवजयंतीचा उत्सव संपुर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या प्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी मोठया उत्साहात व जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा करतात. यावर्षी त्यांनी भव्य गड किल्याचा देखावा साकारला होता. त्यावर आई तुळजा भवानी मातेची प्रतिकृती रेखाटण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागु झाल्यामुळे राजकीय पक्षांना कोणताही सार्वजनीक कार्यक्रम सादर करायचा असल्यास आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. निवडणुक विभागाचे व्हिडीओ सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख जि. एन. देठे यांनी शिवजयंती निमित्ताने साकारण्यात आलेल्या देखाव्याचे चित्रीकरण केले होते.
चिञिकरणात किल्ल्याचे प्रतिकृतीच्या शिखरावर एक भगव्या रंगाचा मोठा झेंडा लावलेला असून त्या झेंड्यावर महाराष्ट्र सेनेचे नाव व पक्षाचे चिन्ह मुद्रीत केल्याचे दिसून आले, तर किल्ल्याचे शिखराचे दोन्ही बाजुने दोन लहान झेंडे लावल्याचे व त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव व पक्षाचे चिन्ह मुद्रीत केल्याचे दिसून आले. तसेच कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी घेण्यात आलेली नाही असे आढळून आल्याने आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याची तक्रार वणी पोलीसात करण्यात आली.
शिवजयंती निमित्य आयोजीत कार्यक्रमात आदर्श आचार संहितेचा भंग झाल्याचे दिसुन येत असल्याने कार्यक्रमांचे आयोजक वैभव सुनिल पुराणकर रा. वणी याचेवर कायदेशीर कारवाई बाबत पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे.
Rokhthok News