Home Breaking News Wani update…|| Facebook च्या माध्यमातून ओळख आणि वारंवार...

Wani update…|| Facebook च्या माध्यमातून ओळख आणि वारंवार ‘अत्याचार’

पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

वणी: समाज माध्यमाचा वापर घातक वळणावर येवून ठेपला आहे. Facebook च्या माध्यमातून ओळखी आणि लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने वारंवार ‘अत्याचार’ करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाविरोधात गुरुवारी तक्रार दाखल होताच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मयूर उर्फ साजिद खा साहेब खा पठाण (24) हा शहरातील पंचशील नगर परिसरात वास्तव्यास आहे. Facebook च्या माध्यमातून त्याने 21 वर्षीय विवाहितेसोबत ओळख निर्माण केली आणि संभाषण वाढतच गेले.

सातत्याने दोघांत होत असलेल्या ‘चॅटिंग’मुळे त्यांच्यात जवळीक वाढली. पीडितेचा पती घरी नसताना त्याचे तिच्या घरी ये-जा वाढली या दरम्यान त्याने बळजबरीने तिच्या सोबत ‘संबंध’ प्रस्थापित केले.

Img 20250103 Wa0009

पीडिता तिच्या दोन मुलीसह घरी असताना दि. 6 जानेवारीला सायंकाळी ‘मयूर’ तिच्या घरी आला. याप्रसंगी पीडितेने संबंधाला विरोध दर्शविला असता त्याने दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत लग्नाचे आमिष दाखवले आणि बळजबरीने पुन्हा अत्याचार केला.

सातत्याने होत असलेल्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने गुरुवार दि. 20 जानेवारीला वणी पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. ठाणेदार शाम सोनटक्के यांनी घटनेचे गांभिर्य बघता भादंवि 376, (2), (N), 417, 506 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleखळबळ… वणीत मानवी “सांगाडा” आढळला
Next articleबापरे….आज वणीत 27 कोरोना ‘बाधित’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.