● विक्रीच्या उद्देशाने दात व नखं चोरली का ?
● वन विभाग एक्शनमोड वर
Wani News | तालुक्यातील उकणी कोळसा खदान परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृत वाघ आढळला आणि खळबळ माजली. मृतावस्थेतील वाघाची नखं व सुळे दात लंपास झाली होती. गोपनीयरित्या तपासाअंती चौघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. अजूनही काही अवयव गायब असल्याने वेकोलिचे आणखी कोण अडकणार.! हे सांगता येत नाही. वन विभाग एक्शनमोड वर असून वाघाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यावर सुद्धा कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे. Who else will be stuck with wcl as some parts are still missing.!

तालुक्यातील उकणी येथे एक मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या वाघाचे नख व दात चोरीला गेले होते. या प्रकरणी वनविभागाने कारवाई करीत 4 संशयीतांना ताब्यात घेतले. सतीश अशोक मांढरे (32), आकाश नागेश धानोरकर (26) दोघेही राहणार वणी, नागेश विठ्ठल हिरादेवे (41) व रोशन सुभाष देरकर (32) दोघेही राहणार उकणी ता. वणी असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. संशयीत आरोपी वेकोलीचे कर्मचारी आहेत. आरोपींकडून काही नखं व 4 दात जप्त करण्यात आले आहे.
● वन कर्मचाऱ्याने त्याला वाचवले अन्यथा… आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना आरोपींना जामीन दिला तर दोन आरोपींना वन विभागाची कोठडी सुनावण्यात आली होती. त्या आरोपींना न्यायालयातून सहाय्यक वनसंरक्षक यांच्या कार्यालयामध्ये आणण्यात आले होते. त्याच वेळी आरोपी नागेश विठ्ठल हिरादेवें यांनी संडासला जावयाचे सांगितले. त्याला कार्यालयीन प्रसाधन गृहात पाठविले मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नव्हता त्यास आवाज दिला परंतु तिकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे कर्तव्यावरील कर्मचारी यांनी दार तोडून गळफास घेत असतानाच त्याला सोडवले व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सदर आरोपीची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
वेकोलि कर्मचारी व परिसरातील नागरिकांची वन विभागाने चौकशी केली असता त्यांना नखं व दात कुणी चोरून नेले याची माहिती मिळाली. त्यावरून कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी वेकोलिचे आणखी कोणी अडकले आहे का ? तसेच चोरी केलेल्या नखं व दातांचे काय केले जाणार होते? याचे उत्तर तपासाअंती मिळणार आहे. या प्रकरणाची चौकशी उप वनसंरक्षक पांढरकवडा धनंजय वायभासे, सहाय्यक वनसंरक्षक संगिता कोकणे, परिविक्षाधीन सहाय्यक वनसंरक्षक आशिष देशमुख व वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर करीत आहे.
Rokhthok News