● तीन लेकरांच्या आधारवड गेला
Sad News | ऑटोत बसून घरी परतत असताना ऑटोचा अपघात (Auto accident) झाला. ऑटोतून 45 वर्षीय महिला बाहेर फेकल्या गेली. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तीचा (Unfortunately) घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. 19 जानेवारीला सायंकाळी राजुर मार्गावरील सोना माता मंदीराजवळ घडली. She (unfortunately) died on the spot due to severe head injuries.
रंजना जंगमवार (45) ही महीला राजुर येथील रहीवासी होती. ती लालपुलीया परीसरातील कोल डेपोमध्ये मजुरी करायची. सायंकाळी काम आटोपल्यानंतर गावी परत जाण्यासाठी ऑटोत बसली. राजुर मार्गावरील सोना माता मंदीराजवळ ऑटो चालक रहेमत रहीम खान याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झालेल्या अपघातात महिलेला जीव गमवावा लागला.

ऑटोत खचाखच प्रवासी भरल्याचे बोलल्या जात असून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. मृतक रंजना यांच्या डोक्याला मार लागला, अति रक्तस्त्राव झाला त्यांना तातडीने वणी येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. तीला दोन मुल व एक मुलगी आहे. तिच्या मृत्युमुळे लेकरं पोरकी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News






