Home Breaking News धक्कादायक…..तरुण गर्भवती विवाहितेने घेतला “गळफास”

धक्कादायक…..तरुण गर्भवती विवाहितेने घेतला “गळफास”

● प्रेम विवाहाचा दुःखद अंत, असं काय घडलं..!

1537
C1 20240930 21091415
Img 20250630 wa0035

प्रेम विवाहाचा दुःखद अंत, असं काय घडलं..!

Sad News : घरी कोणीच नव्हते, ओढणीच्या साह्याने तिने गळफास लावला व स्वतःला संपवले. गर्भवती विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असून तिचा प्रेम विवाह झाला होता आणि ती सात महिन्याची गर्भवती होती असं समजते. या धक्कादायक घटनेने पारिवारिक मंडळी शोकाकुल झाली असून ही घटना सोमवारी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. There was no one at home, she hanged herself with a rope

Img 20250630 wa0037

पायल गौरव उरकुडे (21) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. ती आपल्या कुटुंबियांसह मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परसोडा या गावी वास्तव्यास होती. घटनेच्या दिवशी तिने सकाळी ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब कळताच पारिवारिक मंडळींनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवला.

Img 20250103 Wa0009

प्रेम विवाह केलेल्या पायल ने टोकाचे पाऊल का उचलले हे कळायला मार्ग नसून ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दोन जिवाच्या आत्मघातकी निर्णयाने प्रचंड खळबळ माजली असली तरी तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस पुढील तपास करत आहे. परंतु या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News