Home Breaking News त्याची…..गळफास लावून आत्महत्या

त्याची…..गळफास लावून आत्महत्या

● तरुणाने संपवले आयुष्य

1229
C1 20240708 21280761

तरुणाने संपवले आयुष्य

Sad News | मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे वास्तव्यास असलेल्या 29 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. A 29-year-old youth committed suicide by hanging himself.

Img 20250422 wa0027

सतीश दिलीप मेश्राम (29) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह वेगाव येथे वास्तव्यास होता. मोलमजुरी करून तो आपल्या परिवाराचा गाडा हाकत होता. सोमवारी सायंकाळी तो गावलगतच्या शेतात गेला. झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

Img 20250103 Wa0009

प्रत्यक्षदर्शीना गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसल्याने ग्रामस्थांना याबाबत कळवले तसेच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृतकाच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुली असा परिवार आहे पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News