Home क्राईम शाब्दिक वाद चिघळला, कोळसा व्यावसायिकाला ‘मारहाण’

शाब्दिक वाद चिघळला, कोळसा व्यावसायिकाला ‘मारहाण’

● 5 अटकेत 7 पसार, वणी पोलीसांची कारवाई

1448

5 अटकेत 7 पसार, वणी पोलीसांची कारवाई

Crime News Wani | शहरालगत चिखलगाव हददीतील मेघदुत कॉलनीमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या कोळसा व्‍यवसायीकाला समव्‍यवसायीक गटाकडुन लाठी काठीने मारहाण करण्‍यात आली. याप्रकरणी तक्रारीअंती वणी पोलीसांनी 12 जणांवर विविध कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. याघटनेतील 5 आरोपींना पोलीसांनी ताब्‍यात घेतले असुन 7 जण पसार झाले आहे. 5 accused in the incident have been taken into custody by the police and 7 have escaped.

Img 20250422 wa0027

मतीन अहेमद वहाज अली शेख (35) ढुमणे ले- आउट,  अनवर खान हबीब खान (41) राजुर कॉलरी, मोहम्‍मद अतीक वहाज अली शेख (27) राजुर कॉलरी, जिमल अनुलहक शेख (21) राजुर कॉलरी व बाबु उर्फ नसिर खान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर अन्‍य 7 आरोपी पसार झाले आहे.

Img 20250103 Wa0009

कोळसा व्यावसायिकात अनेक वेळा व्यावसायिक स्‍पर्धेतुन वाद होत असतात. वादाचे रूपांतर मारहाणीत घडल्‍याचे अनेक उदाहरणे आहेत. घटनेच्‍या एक दिवसांपुर्वी फिर्यादी तिरूपती बकय्या लकमावार हे त्‍यांचे व्‍यवसायीक भागीदार महेश मातंगी यांचेसह वरोरा येथे कामानिमीत्‍य गेले होते. एकोणा खान परीसरात त्‍यांचा खाणीतील सुपरवायझर सोबत वाद झाला.

दुसऱ्या दिवशी दि. 1 जैुलला मतीनचा लहान भाऊ अतीक याने तिरूपती याला फोन करून माझ्या भावाला तु शिव्‍या का दिल्या म्‍हणुन विचारणा केली. वाद वाढतच गेला तसेच तिरूपतीला मारण्‍याची धमकी दिली. शनिवारी रात्री बोलेरो वाहन क्रमांक MH- 34- BR- 8787 व प्रवाशी वाहन मध्‍ये 12 व्‍यक्‍ती लाठीकाठी सह मेघदुत कॉलनीतील तिरूपती यांच्‍या घरी धडकले व तिरूपतीला मारहाण केली.

तिरूपती लकमावार यांनी पोलीस स्‍टेशन गाठुन रितसर तक्रार दाखल केली. पोलीसांनी तातडीने आरोपींची धरपकड करत विवीध कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. घडलेल्‍या या प्रकारामुळे मेघदुत कॉलनीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यावसायिक स्‍पर्धेतुन कोळसा व्यवसायिकात वाद होऊ नये यासाठी पोलीसांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News