● सहा आरोपी अटकेत, दोघे फरार
● पोलिसांनी तत्परतेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Crime News : वणी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. लाठ्या काठ्यांनी भयंकर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर दोघे फरार झाले. ही भयावह घटना सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. A young man was fatally attacked within walking distance of the police station.
विलास चौहाण, विशाल चौहाण, सुर्यभान चौहाण, विरसिंग उर्फ विरु लीवारे, दुर्गेश उर्फ सोनु चौहाण, असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. यातील एक विधी संघर्षग्रस्त आहे तर दोघे अनोळखी तरुण पसार झाले आहेत. शहरातील जी.आर. नास्ता सेंटरजवळ सात जणांनी संगनमत करून अंकुश मोगरे या तरुणावर लोखंडी रॉड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.
सविस्तर माहिती अशी की, पानठेल्याजवळ गाडी उभी करण्यावरून सुरुवात झालेला वाद क्षणात रौद्ररूप धारण करून रक्तरंजित हल्ल्यात परिवर्तीत झाला. अंकुश मोगरेला जमिनीवर पाडून वारंवार काठ्यांनी व लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर, हातापायावर बेदम मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी नगर परिषद कर्मचारी भोलेश्वर नारायण ताराचंद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. घटनेत अंकुश मोगरे गंभीर जखमी झाला असून त्याला जीवंत ठेवायचा की संपवायचा, अशा विक्राळ स्वरूपाचा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोगरे पोलिस स्टेशनकडे धाव घेत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून पुन्हा तहसिल कार्यालयाजवळ निर्दय मारहाण केली.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात कलम 109, 189(1)(2)(3)(4), 190, 191(1)(2)(3) BNS अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुदाम आसोरे करीत आहेत. जखमी तरुणांवर चंद्रपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
ROKHTHOK






