Home क्राईम उप विभागात गुटखा आणि सुगंधीत तंबाखू खरंच विकल्या जातो का..!

उप विभागात गुटखा आणि सुगंधीत तंबाखू खरंच विकल्या जातो का..!

● FDA चे अधिकारी पूर्णतः निष्प्रभ, कारवाईच्या नावाने "बोंबाबोंब" ● नागरिक कर्करोगाच्या विळख्यात

C1 20251226

FDA चे अधिकारी पूर्णतः निष्प्रभ, कारवाईच्या नावाने “बोंबाबोंब”
नागरिक कर्करोगाच्या विळख्यात

Crime News :
वणी शहर व उपविभागात गुटखा आणि सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री, साठवणूक व तस्करी सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे अधिकारी व पोलीस पूर्णतः निस्तेज, निर्विकार व कुंभकर्णी झोपेत आहेत. प्रशासन मात्र याविषयी “मजा” घेत असल्याचे स्पष्ठपणे दिसत असले तरी अनेक स्थानिकांना कर्क रोगाचा विंचू “चावला” हे वास्तव नाकारता येत नाही. Are gutkha and flavored tobacco really sold?

सध्यस्थीतीत वणीमध्ये गुटखा बंदी केवळ नावापुरतीच राहिली आहे. शहरातील कोणत्याही चौकात, गांधी चौक, जुना बस स्टँड परिसरातील “दीपक” की रोशनी में मालामाल झालेला तसेच पोलीस दप्तरी नोंद असलेला तस्कर होलसेलर असल्याचे पोलीस व अन्न व औषध विभागाला दिसत नसल्याने सर्वसामान्यांनी दाद कोणाला मागायची असे कोडे पडले आहे.

पोलिस ठाण्याच्या बाहेर असलेल्या टपरीवरसुद्धा निर्भयपणे गुटखा, खर्रा दिला जातो. आता कारवाईची भीतीच प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांच्या मनातून नाहीशी झाली आहे. खुलेआम बाजार मांडला आहे, बिनधास्त प्रतिबंधित तंबाखू व गुठका अन्यत्र वितरित केल्या जातो, वाहन जप्त करण्यात येते पोलिसांची थातुरमातुर कारवाई होते मात्र मुख्य आरोपी पर्यंत पोलिसांचे “लंबे” हात पोहचतांना दिसत नाही.

Img 20250103 Wa0009

विश्वसनीय सूत्रांनुसार, FDA चे अधिकारी येणार असल्याची खबर सर्वप्रथम जुन्या बस स्थानक परिसरातील सराईत होलसेल व्यापाऱ्याला दिली जाते. तो पुढे ही माहिती सर्व किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतो. अधिकारी शहरात आल्यानंतर होलसेल व्यापाऱ्याच्या ‘मर्जीनुसार’ एखाद्या छोट्या किरकोळ दुकानदारावर नाममात्र कारवाई केली जाते. हीच परिस्थिती संपूर्ण वणी उपविभागात असल्याचे चित्र आहे.

प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, साठवणूक व वितरण करून सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या तस्करांविरोधात आता कठोर, non-bailable कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.कायदे तज्ज्ञांच्या मते,  केवळ  COTPA 2003 अंतर्गत कारवाई मर्यादित ठरते, मात्र अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि Food Safety and Standards Act, 2006 मधील गंभीर कलमे लागू केल्यास आरोपींना जामीन मिळणे अत्यंत कठीण होणार आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा-सुगंधीत तंबाखूचा ‘सुपर स्टॉकिस्ट’ वणीमध्येच असल्याची माहिती प्रशासनाकडे असताना, तो कुठे साठवणूक करतो, तस्करी कशा प्रकारे होते आणि वितरण व्यवस्था कशी आहे याची संपूर्ण माहिती अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाकडे उपलब्ध आहे. त्यातच ‘कारवाई झाली’ हे दाखवण्यासाठी एखाद्या छोट्या विक्रेत्यावर लहानसहान कारवाई केली जाते, मात्र जाणीवपूर्वक मोठ्या माशांकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप जोर धरत आहे.

“प्रतिबंधित तंबाखूची विक्री हा केवळ नियमभंग नसून तो मानवी जीविताला धोका पोहोचवणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये BNS कलम 328 व FSS Act कलम 59 अंतर्गत non-bailable गुन्हे नोंदविणे कायदेशीरदृष्ट्या योग्य व आवश्यक आहे, मात्र तसे होतांना दिसत नाही.
Rokhthok

Previous articleउपाध्यक्ष पदावर कोणाची लागणार वर्णी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.