Home क्राईम चार आरोपी अटकेत, 30 लाखाचा मुद्देमाल जप्त

चार आरोपी अटकेत, 30 लाखाचा मुद्देमाल जप्त

● गोवंश तस्करीचा पर्दाफाश, LCB ची दणदणीत कारवाई

C1 20251216
IMG 20260522 WA0013

गोवंश तस्करीचा पर्दाफाश, LCB ची दणदणीत कारवाई

Crime News :
पोलीस ठाणे वडकी हद्दीतून जाणाऱ्या नागपूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर गोवंशीय जनावरांची अवैध तस्करी करणाऱ्या दोन ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा(LCB), यवतमाळ यांनी धडक कारवाई करत 65 जिवंत बैलांची सुटका केली असून सुमारे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. Four accused arrested, goods worth Rs 30 lakh seized

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 15 डिसेंबरला पांढरकवडा उपविभागात पेट्रोलिंग करीत होती. त्याचवेळी गोपनीय माहिती मिळाली की, ट्रक क्रमांक MH-40-Y- 0951 व MP-04-HE- 3515 मधून कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. या माहितीनुसार पथकाने सिंधोडा परिसरात सापळा रचला. तपासात सदर ट्रक भारत पेट्रोल पंपाजवळील जय बजरंग बली राजस्थानी धाब्याच्या पार्किंगमध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले.

IMG 20260511 WA0005

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रकची झडती घेतली असता, दोन्ही वाहनांत 65 जिवंत बैल व 1 मृत गोरा असे एकूण 66 गोवंश दाटीवाटीने, कोणतीही चारापाणी व्यवस्था न करता, अत्यंत असुरक्षित अवस्थेत वाहून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. जनावरांची अंदाजे किंमत 9 लाख 80 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी शेख शहनवाज शेख महेबुब (31), शेख अरबाज शेख कलीम (25), मो. नसरुद्दीन दुरशाहीन कुरेशी (28) व मो. हसन रोशन अंसारी (26) सर्व रा. नागपूर, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सदर गोवंश हा वकार कुरेशी, रा. कामठी, नागपूर याचा असून त्याच्या सांगण्यावरून जनावरे हैद्राबाद येथे नेत असल्याची कबुली आरोपींनी दिली. वकार कुरेशी हा आरोपी सध्या फरार आहे.

सुटका करण्यात आलेल्या 65 बैलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची चारापाणी व देखभालीसाठी गोकुलम गो संरक्षण संस्था, पहापळ, ता. केळापूर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन ट्रक, मोबाईल फोन तसेच 66 गोवंश असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे वडकी येथे प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायदा, प्राणी संरक्षण कायदा व भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी पार पाडली आहे.
Rokhthok

Previous articleझुंजार पत्रकार रवी ढुमने यांचे निधन
Next articleदुःखद : विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.