● VDO व्हायरल करण्याची धमकी, तक्रारीअंती गुन्हा नोंद, सतर्कतेचे आवाहन
Crime News :
समाज माध्यमावर ओळख वाढवून विवाहित महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यासाठी भाग पडले. तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत Blackmail करण्यात आले. तक्रारी अंती एका नराधमाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Blackmail: She took off her clothes and….!
वाजिद हुसेन (39) हा मोमीनपुरा परिसरात वास्तव्यास असून त्याचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्तृत वृत्त असे की, शहरालगत असलेल्या एका गावातील महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर संवाद सुरू झाला.
एकदिवस संवादाच्या माध्यमातून आरोपीने महिलेला व्हिडीओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले. विरोध केल्यास “तुझ्या पतीला आपले संबंध सांगतो” अशी धमकी देऊन तिच्यावर मानसिक दबाव टाकला. पीडित महिलेने भीतीपोटी अंगावरील कपडे दूर सारले आणि….आरोपीने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठविला.
त्या व्हीडिओ च्या आधारे पीडित महिलेला ब्लॅकमेल करत त्याने 8 जूनला पुन्हा फोन करून “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुझे नग्न फोटो नातेवाइकांना व्हायरल करतो,” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली. तिने थेट पोलीस ठाणे गाठून ठाणेदाराला आपबीती कथन केली.
ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी वाजिद हुसेन याचेवर भारतीय दंड विधान कलम 75, 77, 351 (2) तसेच भारतीय दंड संहिता (BNS) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66(E) अन्वये गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Rokhthok News






