● अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या
● वणी पोलिसांची कारवाई, दोन आरोपी जेरबंद
Crime News :
वणी शहरात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडाचा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. या हत्येमागे अनैतिक संबंधाचा धागा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. Brutal murder of a young man due to an immoral relationship
सुमेश रमेश टेकाम (24) व सौरभ मारोती आत्राम (27) दोघेही वडजापूर, तालुका वणी येथील निवासी आहेत. शहरात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडाचा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला असून, या हत्येमागे अनैतिक संबंध असल्याचे धक्कादायक कारण उघड झाले असून दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
मृतक स्वप्नील किशोर राऊत (26) रा. रंगनाथनगर, वणी याला गुरुवारी अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ठेकेदाराकडून पैसे आणायचे आहेत असे सांगून तो घराबाहेर पडला. सायंकाळी 6 वाजता पत्नीशी बोलताना “लवकरच घरी येतो” असे सांगून तो निघाला, मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला आणि तो परतलाच नाही.
दुसरी दिवशी सकाळपासून कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला असता, सायंकाळी गजानन नगरी, वडगाव (टीप) रोड परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर स्वप्नीलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, गळा व डोक्यावर गंभीर जखमा असलेल्या अवस्थेत आढळला.
उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तपास सुरू केला. सोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची दिशा ठरवली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतकाच्या शेवटच्या हालचालींचा मागोवा घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
ROKHTHOK






