Home क्राईम Crime…’सार्थक’ ची निर्घृण हत्या, का आणि कशासाठी..!

Crime…’सार्थक’ ची निर्घृण हत्या, का आणि कशासाठी..!

● तालुक्यात उडाली प्रचंड खळबळ

2170
Img 20250630 wa0035

● तालुक्यात उडाली प्रचंड खळबळ

रोखठोक| दिग्रस तालुक्यातील विठोली या गावात सकाळी भयंकर घटना घडली. अवघ्या 17 वर्षीय बालकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जबर प्रहार करण्यात आला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून ‘सार्थक’ ची निर्घृण हत्या, का आणि कशासाठी..! करण्यात आली याचा छडा पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे. Cruel murder of ‘Sarthak’, why and for what..! It will be revealed from the police investigation.

Img 20250630 wa0037

सार्थक दीपक गावंडे (17) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह विठोली या गावात वास्तव्यास होता आणि त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. घटनेच्या दिवशी तो सकाळी वडिलांसोबतच शेतात वैरण आणण्यासाठी जाणार होता. मात्र वडिलांना थोडा वेळ असल्याने सार्थक एकटाच शेतात गेला होता.

Img 20250103 Wa0009

शेतात पोहचल्या नंतर त्याचेवर मारेकऱ्यांनी धारधार कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्याचे डोक्यावर जबरदस्त वार करण्यात आला तर पाठीवर सुद्धा मारण्यात आले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

काही कालावधी नंतर त्याचे वडील शेतात पोहचले असता त्यांना मुलगा सार्थक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी आरडाओरडा केला, काय करावं त्यांना सुचत नव्हतं, लगतच्या शेतातील शेतकरी जमा झाले त्यांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दिग्रस पोलीस व LCB स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणी तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अवघ्या सतरा वर्षाच्या बालकाची हत्या का व कशासाठी करण्यात आली हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून घडलेल्या घटनेने कमालीची खळबळ माजली आहे.
● बातमीदार