Home क्राईम त्याने चक्क…. घरातील सोन्याचे दागिनेच केले लंपास

त्याने चक्क…. घरातील सोन्याचे दागिनेच केले लंपास

● वणी पोलिसांकडून पावणेसात लाखांच्या घरफोडीचा छडा, दोघे ताब्यात, 52 ग्रॅम सोने जप्त....

C1 20260902

● वणी पोलिसांकडून पावणेसात लाखांच्या घरफोडीचा छडा, दोघे ताब्यात, 52 ग्रॅम सोने जप्त….

CRIME NEWS :
iPhone’s insistence, gold jewelry in the house was stolen ..कनकवाडी परिसरात झालेल्या तब्बल 6 लाख 72 हजार रुपयांच्या घरफोडीचा वणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. iPhone 16 Pro खरेदी करण्याच्या हट्टापायी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने आपल्या आजोबांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एका 23 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, विधीसंघर्षग्रस्त बालकाकडूनही चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्य एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

कनकवाडी, येथील बंडु विठोबा बोढाले (62) यांच्या घरी 20 ऑगस्टच्या रात्रीपासून 21 ऑगस्टदरम्यान घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील 52 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे, लंपास केले होते. याप्रकरणी 1 सप्टेंबर रोजी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

IMG 20261102 WA0001

गुन्ह्याचा समांतर तपास पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे संविधान चौक परिसरातून एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (23) राहणार विठ्ठलवाडी, वणी याला ताब्यात घेण्यात आले.

Img 20250103 Wa0009

पोलिसांनी केलेल्या चौकशीत विधीसंघर्षग्रस्त बालकाने पंचांसमक्ष चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. iPhone 16 Pro खरेदी करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने ही बाब आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर गुणवंत दानव आणि फरार आरोपी सुरज हुसैन गेडाम (25) राहणार दहेगाव (विरकुंड), याने त्याला प्रोत्साहित केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे समजते.

त्यानंतर 20 ते 21 ऑगस्टच्या रात्री विधीसंघर्षग्रस्त बालकाने स्वतःच्या आजोबांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीने उघडून सोन्याचे दागिने चोरल्याचे समोर आले. चोरी केलेले सोने विक्री करण्याच्या उद्देशाने दोघे चंद्रपूर किंवा नागपूरच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या हाती लागले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 25 ग्रॅम वजनाचा चपलाकंठी सोन्याचा हार, 15 ग्रॅम वजनाचा मोठा सोन्याचा गोप, 5 ग्रॅम वजनाचा लहान सोन्याचा गोप, 3 ग्रॅम व 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, असा एकूण 52 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल, किंमत 6 लाख 72 हजार रुपये, जप्त केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सुरज गेडाम याचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे आणि पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सैय्यद साजिद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, तसेच पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे आणि रितेश भोयर यांनी कारवाईत सहभाग घेतला. स्थानिक डीबी पथकाने अतिशय शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला.
ROKHTHOK