Home Breaking News ओबीसी कॉलम नाही, तर जनगणना नाही!

ओबीसी कॉलम नाही, तर जनगणना नाही!

● जातनिहाय अचूक नोंदणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाचा केंद्राला निर्वाणीचा इशारा

C1 20260902

जातनिहाय अचूक नोंदणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाचा केंद्राला निर्वाणीचा इशारा

WANI NEWS :
No OBC column, no census…! आगामी जनगणनेत ओबीसी (VJ, NT, SBC) समाजाची जातनिहाय अचूक नोंद व्हावी, यासाठी स्वतंत्र ओबीसी कॉलम आणि संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ लागू करण्याची मागणी सकल ओबीसी महामोर्चा व जातनिहाय जनगणना समितीने केली आहे. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.

2011च्या जातनिहाय जनगणनेतील ओपन-एंडेड पद्धतीमुळे जाती-पोटजातींच्या नोंदींमध्ये उच्चार, स्पेलिंग व स्थानिक नावांतील फरक निर्माण झाल्याने आकडेवारीच्या अचूकतेवर परिणाम झाल्याचा दावा समितीने केला. त्यामुळे SC व ST प्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम आणि केंद्रीय व राज्य मागासवर्गीय याद्यांवर आधारित ड्रॉप-डाऊन यादी करण्याची मागणी करण्यात आली.

मागणी मान्य न झाल्यास 1 सप्टेंबरपासून देशव्यापी तीव्र आंदोलन छेडून आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समितीने दिला आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री, जनगणना आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना पाठविण्यात आल्या.

Img 20250103 Wa0009

याप्रसंगी प्रदीप बोनगिरवार, प्रा. विजय बोबडे, राजू पिंपळकर, प्रा. नितीन मोहितकर, प्रभाकर मोहितकर, सुभाष वैद्य, गुलाबराव वांढरे, पुंडलिकराव मोहितकर, पांडुरंग पंडिले, गजानन चंदावार, सुरेश राजूरकर, अजय चन्ने, किशोर ओचावार, श्यामराव घुमे, सुधीर थेरे, शरद ठाकरे, डॉ. उत्तम पावडे, भालचंद्र मोहितकर, वैभव डंभारे, गजेंद्र भोयर, मोहन डोंगे, नत्थू चहांदकर, राकेश भोयर, नारायण मांडवकर, दिवाकर नरुले, कृष्णदेव विधाते, श्याम ठाकरे, कैलास मेश्राम, अनिल तेलंग, नामदेवराव जेणेकर, अनिकेत बदखल, रामभाऊ खिरटकर, सतीश वराटे, रमेश येरणे, अनिल जांभुळकर, मारोती भोस्कर यांच्यासह बहुसंख्य ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
ROKHTHOK