
● (LCB) स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
● शहरातील तरुणाई नशेच्या गर्तेत
CRIME NEWS : शहरात अमली पदार्थांचा विळखा वाढतच चाललाय. गांजा, अफीम, MD Drugs च्या विळख्यात तरुणाई अडकली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे टिळक चौकात सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री MD Drugs ची देवाणघेवाण करणारे दोन तरुण अलगद जाळ्यात अडकले. यावेळी 3.37 ग्राम एमडी पावडर सह सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. MD Drugs: Two arrested, goods worth Rs 3.5 lakh seized
युगांत दिनेश दुर्गे (19) राहणार शिवाजी चौक विसापूर, जि. चंद्रपूर, ह.मु. पंचशील नगर वणी व शहबाज सत्तार मिर्झा (35) साई नगरी वणी या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोघांवर NDPS कायद्याच्या कलम 8(c), 21(a), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली API दत्ता पेंडकर, हेडकॉन्स्टेबल सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख व सतीश फुके यांच्या पथकाने केली.
Rokhthok