Home क्राईम धक्कादायक घटना : पत्रकार असल्याचे भासवून दमदाटी, इसमाची आत्महत्या

धक्कादायक घटना : पत्रकार असल्याचे भासवून दमदाटी, इसमाची आत्महत्या

● सततच्या धमक्या व पैशांची मागणी ● मृतकाच्या भावाचा खळबळजनक आरोप

C1 20250909 14044401

सततच्या धमक्या व पैशांची मागणी
मृतकाच्या भावाचा खळबळजनक आरोप

Crime News :
तालुक्यातील डोंगरगाव (विरकुंड) येथे वास्तव्यास असलेला व पत्रकार असल्याचा आव आणणाऱ्या वैभव गजानन पोटवडे यांच्या सततच्या धमक्या व पैशांच्या जबरदस्तीच्या मागण्यांना कंटाळून शेतकरी सुहास हरी हिंगाणे (45) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. Shocking incident: Isma commits suicide after being harassed by a journalist

Img 20250103 Wa0009

मृतक सुहास हिंगाणे हे मजुरीसोबत ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. वैभव पोटवडे हा स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून गावातील लोकांना धमकावत असायचा. त्याने हिंगाणे यांच्याकडून महिन्याला 50 हजार रुपयांची खंडणी मांगीतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

“पैसे दिले नाही तर तुझा ट्रॅक्टर रेतीसह पकडून देतो, धंदाच बंद करतो” अशा शब्दांत सतत दबाव टाकून त्रास देत असल्याचे सुध्दा नमूद करण्यात आले आहे. सततच्या धमक्या व पैशांची मागणी यामुळे हिंगाणे हे सतत मानसिक तणावाखाली राहात असल्याने त्यांनी 4 सप्टेंबरच्या रात्री विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान 8 सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

उपचारादरम्यान तो मृत्यूशी झुंज हरला..!

मृतकाचे भाऊ सुभाष हिंगाणे यांनी वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत “माझ्या भावाच्या आत्महत्येस वैभव गजानन पोटवडे जबाबदार असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ पोटवडेवर गुन्हा नोंदवून अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बोगस पत्रकारांचा सुळसुळाट

ज्यांना बातमीचा मतितार्थ, शुद्धलेखन आणि व्याकरणाचा गंध नाही असे कॉपीपेस्ट बोगस पत्रकार उदयास आले आहे. ब्लॅकमेलिंग करणारे, खंडणी मांगणारे भामटे स्वतःला पत्रकार भासवतात. सोज्वळ, साध्या व्यक्तीने त्रस्त होत मृत्यूला कवटाळले यापेक्षा दुर्दैवी घटना कोणती? याप्रकरणी कठोर कारवाई अपेक्षित आहे.
ROKHTHOK