● शहरात भाईगिरीचे प्रमाण वाढले
● पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज
Crime News : शहरातील एकतानगर समोर वणी-वरोरा मार्गावरील पान टपरी चालकाला चार-पाच गावगुंडांनी पान टपरित घुसून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान घडली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र मारहाणीचे दृश्य पाहून Beed pattern ची झलक वणीत दिसत आहे. The paan stall driver was brutally beaten by four or five village goons who entered the paan stall.
शहरातील काजीपुरा येथील रहिवासी साजिद रफिक शेख (वय 36) यांनी वणी पोलीस ठाण्यात गैरअर्जदार शब्बीर खान (वय 50) व त्याचे दोन पुत्र साकीब शब्बीर खान (वय 19), सद्द शब्बीर खान (वय 22) यांच्याविरोधात मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार शेख हे वणीतील एकता नगर भागात पानठेला चालवतात. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता, ते आपले रोजचे काम करत असताना, गैरअर्जदार शब्बीर खान व त्याचे दोन पुत्र अचानक त्यांच्या पानठेल्यासमोर आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी साजिद शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादविवाद वाढल्यानंतर तिघांनी मिळून साजिद शेख यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
आरोपींनी जिवे मारण्याची गंभीर धमकी दिल्याचे साजिद शेख यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून त्त्यांच्यामुळे जीवितास धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 352, 351(2), 351(3) नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या मारहाणीचे दृश्य बघून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Rokhthok News