● 45 हजाराचा मुददेमाल हस्तगत
Crime News | वेकोलीच्या नायगांव खदानीतुन वीस हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक केबल चोरीला गेले होते. याप्रकरणी दिनांक 22 ऑगष्टला शिरपुर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ठाणेदार गजानन करेवाड यांनी तात्काळ तपासयंञणा कार्यान्वित करत आरोपीचा छडा लावला असुन 45 हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. API Gajanan Karewad immediately launched an investigation and nabbed the accused.

अमोल हिरामण रामटेके (38) असे अटकेतील चोरटयाचे नांव आहे. तो हनुमान नगर येथील निवासी आहे. मंगळवारी राञी गुन्हा नोंद होताच पोलीसांनी गोपनिय माहितगारांना सतर्क केले. याप्रकरणी आरोपीला बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे.
केबल चोरटयाला ताब्यात घेण्यात आल्या नंतर त्याने गुन्हयाची कबुली दिली असुन त्याचे जवळुन 25 फूट इलेक्ट्रिक केबल व गुन्हयात वापरलेली दुचाकी असा एकुन 45 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई वरिष्ठ अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात API ठाणेदार गजानन करेवाड, सुनील दुबे, निलेश भुसे, गजानन सावसाकडे, विजय फुलके यांनी केली.
ROKHTHOK NEWS