
● बार मालकावर मिरची पुड फेकून मारहाण
CRIME NEWS :
शहरातील बाजार समिती परिसरात असलेल्या ज्योती बार ऍड रेस्टॉरंटमध्ये 7 ते 8 महिलांनी बार मालकाला बेदम मारहाण केली. मिरची पूड डोळ्यात फेकून पाईप व लाकडी दांडक्यांनी बदडले. महिलांच्या या रौद्ररूपाने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत बार मालक व व्यवस्थापक जखमी झाले असून ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. Women’s “RADA” at Jyoti Bar
Bar owner beaten up by throwing chilli powder
मनोज रामराव ऊरकुडे (41) असे जखमी बार मालकाचे नाव आहे तर बार मॅनेजर आशिष खाडे यालाही मारहाण करण्यात आली. 7 ते 8 महिलांनी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान बारमध्ये प्रवेश करून बार मालकाला अश्लील शिवीगाळ केली, डोळ्यांत मिरची पुड फेकली आणि मारहाण केली. जमावाने केलेल्या मारहाणीमुळे बार मालक व मॅनेजर दोघेही जखमी झाले. शिवाय, “तुझा रिपोर्ट करून तुला फसवितो” अशी धमकीही देण्यात आली होती.
विस्तृत माहिती अशी की, दिनांक 12 सप्टेंबरला शेखर दुर्गमवार (30) रा. राजुर कॉलरी, हा बारमध्ये दारू पिऊन पैसे न देता निघून जात होता. तेव्हा त्याचे नातेवाईकांनी पैसे भरले होते. मात्र, त्यावेळी “उद्या तुला दाखवतो” अशी धमकी दुर्गमवार याने दिली होती. त्याच कारणावरून 13 सप्टेंबरला दुपारी सुमारास दुर्गमवार याने आपल्या नातेवाईक महिलांना बारमध्ये पाठवून गोंधळ घातला.
या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात कलम 189 (2), 191(2), 190, 180(1), 115(2), 296, 351(2)(3) BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करत आहेत. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून आता महिलांना सुध्दा कायद्याचा धाक राहिलेला नाही.
ROKHTHOK