● राजुर गोटा येथे जलशुध्दीकरण केंद्र
WANI NEWS : मुकूटबन येथील RCCPL (आरसीसीपीएल) कंपनी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित असते. राजुर गोटा येथील नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता कंपनी हेड जयंत कंडपाल यांच्या मार्गदर्शनात जल शुध्दीकरण केंद्राचे थाटात उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. RCCPL company at Mukutban has been continuously carrying out social activities.
राजुर गोटा येथे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर होता. अशुध्द पाण्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव जाणवायला लागला होता. ही बाब कंपनी हेड जयंत कंडपाल यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने गावात जलशुध्दीकरण मशीन लावण्याचा निर्णय घेतला.
राजुर गोटा येथे नुकतेच जलशुध्दीकरण केंद्राचे थाटात उदघाटन करण्यात आले याप्रसंगी RCCPL चे युनिट हेड जयंत कंडपाल हे उदघाटक म्हणुन प्रामुख्याने उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास खडसे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुने म्हणुन क्रीष्णकुमार राठोड, दिपक ठाकरे, तेजप्रताप त्रिपाठी, डॉ. विजय, मधुकर मुन, विजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजीत कार्यक्रमात बोलताना कंडपाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, गावाच्या उज्वल भविष्यासाठी व उत्तम स्वास्थासाठी जलशुद्धीकरण केंद्र महत्वाची भूमिका बजावेल. तसेच याप्रसंगी ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त करताना कंपनीचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन भावना वराटे यांनी तर आभार प्रदर्शन सपना काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर घाटे, आदित्य मटकर, शिवम यांनी सहकार्य केले.
Rokhthok News






