Home सामाजिक विराट….ओबीसी एकतेचे प्रतीक ठरला ‘महामोर्चा’

विराट….ओबीसी एकतेचे प्रतीक ठरला ‘महामोर्चा’

● चंद्रपुरात ओबीसीं बांधव एकवटले

615

चंद्रपुरात ओबीसीं बांधव एकवटले

Chandrapur News | चंद्रपूर येथे निघालेला भव्य महामोर्चा हा ओबीसी समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला. पूर्व विदर्भात ओबीसींनी आपला आवाज बुलंद केला आहे. राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेवून ओबीसी समाजाला चर्चेकरीता बोलवावे व ओबीसींच्या मागण्या मंजूर कराव्या अन्‍यथा मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असे वक्तव्य ओबीसी नेते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी यावेळी केले. The grand march at Chandrapur became a symbol of the unity of the OBC community.

Img 20250422 wa0027

c1_20230918_12423943

रविवार दिनांक १७ सप्टेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व पक्षीय तथा ओबीसीतील सर्व जातनिहाय संघटनांनी मिळून महामोर्चा काढला. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवि टोंगे यांना भेट देवून महामोर्चास सुरुवात करण्यात आली. या महामोर्चात हजारोंच्या संख्येत ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्व्हे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे हॉस्टेल सुरु करून स्वाधार योजना लागू करावी. या प्रमुख मागण्या यावेळी रेटून धरण्‍यात आल्‍या. आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनी ओबीसी कार्यकर्ते व नेत्यांसोबत चर्चा करावी व ओबीसी समाजाला आश्वस्त करावे, अशी मागणी करण्यात आली.

ओबीसी महामोर्चात सहभागी सर्व ओबीसी समाज बांधव, सर्व जातनिहाय संघटना व पदाधिकारी, सर्व पक्षीय मान्यवर, कार्यकर्ते यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे डॉ. अशोक जीवतोडे यांनी मनस्वी आभार मानले.
Rokhthok News