Home वणी परिसर कोकणातील पूरग्रस्तांसाठी मनसे सरसावली

कोकणातील पूरग्रस्तांसाठी मनसे सरसावली

331

जीवनावश्यक साहित्य होणार रवाना 

Img 20250422 wa0027

वणी बातमीदार: कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहे. त्या बाधीत कुटुंबाना मदत करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या पुढाकारात शुक्रवारी वणीतून मदतीचा ट्रक जीवनावश्यक साहित्य घेऊन कोकणाकडे रवाना होत आहे.

Img 20250103 Wa0009

मागील आठवड्यात प्रचंड पाऊस झाला त्यामुळे कोकणातील नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेल्या. अनेकांचे बळी गेले. यामुळे कोकणातील नागरिक असाह्य झाले आहे. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेकडून स्वखर्चाने ही मदत दिली जाणार आहे. त्यात 1 हजार ब्लँकेट, 1 हजार साड्या, 3 हजार बिस्कीट पुडे, 3 हजार पाणी बॉटल, 5 टन तांदूळ, दीड टन डाळ, एक हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नास्त्याचे साहित्य आदींचा समावेश राहणार आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता वणीतील शिवाजी चौकातून साहित्याने भरलेला हा ट्रक कोकणाकडे रवाना होणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी  दिली.

मनसेनी केले मदतीचे आवाहन

मनसेकडून मदतीची पहिली खेप शुक्रवारी रवाना होत आहे. वणीतील ज्या नागरिकांना स्वेच्छेने मदत द्यायची असेल, त्यांनी केवळ वस्तू स्वरूपात आपली मदत मनसेच्या रूग्णसेवा केंद्रात आणून द्यावी, रोख रक्कम स्वीकारल्या जाणार नाही असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.