Home वणी परिसर घनकचरा नियोजना करीता ट्रॅक्टर

घनकचरा नियोजना करीता ट्रॅक्टर

107

आ. बोदकुरवार यांच्याहस्ते लोकार्पण

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या राजूर कॉलरी येथील घनकचरा नियोजना करीता 15 वा वित्त आयोग निधी मधून नविन ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला. रविवार दि. 24 ऑक्टोबरला आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याहस्ते नवीनतम ट्रॅक्टर चे लोकार्पण करून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

Img 20250422 wa0027

आयोजित लोकार्पण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संघदिप भगत, मारोतराव बलकी, प्रमोद मिलमिले, सरपंच विद्या दाविद पेरकावार, अश्विनी प्रकाश बलकी, अशोक वानखडे, भालचंद्र हिकरे, वसुंधरा गजभिये, डॅनी संड्रावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Img 20250103 Wa0009

राजूर कॉलरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे या करिता ग्रामपंचायत अनेक उपाययोजना करताहेत. गावातील कचऱ्याची वाहतूक व विल्हेवाट व्हावी यासाठी 15 वीत्त आयोगातून ट्रॅक्टर ची उपलब्धता करण्यात आली.

वणी: बातमीदार