Home वणी परिसर जंगोम दल व वंचितची प्रचारात दणदणीत मुसंडी

जंगोम दल व वंचितची प्रचारात दणदणीत मुसंडी

457

आदिवासी समाज एकवटला
भव्य रॅलीने झरीतील नागरिकांचे वेधले लक्ष

झरी : येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा रविवारी थंडवल्यात. मात्र पहिल्यांदाच निवडणुकीत शिरकाव करणाऱ्या जंगोम दल ने प्रस्थपिताना हादरे देण्याची रणनिती आखली. वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून प्रचार यंत्रणेत दणदणीत मुसंडी मारल्याचे दिसत असून रविवारी काढलेल्या भव्य रॅलीने झरीतील नागरिकांचे लक्ष वेधले.

Img 20250422 wa0027

झरीजामनी नगर पंचायतीच्या निवडणुका 21 डिसेंबर ला होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले आहेत. जंगोम दल व वंचितने 10 उमेदवार उभे करून बलाढ्य राजकीय पक्षा समोर आव्हान निर्माण केले आहे.

Img 20250103 Wa0009

रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी राष्ट्रीय जंगोम दल व वंचित बहुजन आघाडी प्रणित झरीजामनी विकास आघाडीने भव्य मिरवणूक काढली यावेळी आदिवासी समाज बांधव एकवटल्याचे दिसले. मिरवणुकीत जंगोम दल व वंचितचे प्रमुख नेते उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रीय जंगोम दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मारोती उईके, मंगेश मलगाम, सुमित पंधरे, सुवर्णा वरखडे, गोविंद दळवी, लक्ष्मीकांत लोळगे, लक्ष्मण पाटील, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, दिलीप भोयर, कैलास धोटे, विठ्ठल उईके, चेतन कुडमथे, राजू शेख, गजानन मडावी,आदि उपस्थित होते.

मिरवणूकीची सांगता दत्त मंदिर परिसरात करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर कोडापे, सीमा मंडाले, सुनीता मेश्राम, अनिल आत्राम, विकास उईके, राहुल धुर्वे, संगीता किनाके, विन्नता अर्के, कालिदास अर्के या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मोहन अर्के, प्रशांत किनाके, सूरज आत्राम, सचिन कुमरे, आशिष येरमे, दिग्विजय मडावी, मनीष वेट्टी, आशिष उईके, रतन मडावी, श्रीकांत शेडमाके, हरिश किनाके, बंडू आडे, मारोती कुसराम, मारोती गाऊत्रे, विपीन अर्के, मंगेश कुमरे, मोहित आत्राम, तुषार कुमरे, विशाल कुमरे, निरज मडावी, अनीकेत मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.
झरी: बातमीदार