● ना. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन
● श्री.लक्ष्मीनारायण पतसंस्थाचे उद्घाटन
वणी: श्री.लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना ना. यशोमती ठाकूर म्हणल्या की, पतसंस्थांनी महिला बचत गटांना कर्ज देऊन महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा, तळागाळातील नागरीकांचा आर्थिक स्तर उंचावण्याकरीता त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी पतसंस्थेने कर्ज पुरवठा करावा. पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.

शहरातील मुख्य बाजारपेठेत श्री.लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. उद्घाटक म्हणून राज्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी खा. बाळू धानोरकर हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड चे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, रंगनाथ स्वामी अर्बन पतसंस्थेने 11 महिन्याच्या कालावधीत यश संपादन केले त्याप्रमाणेच श्री लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्था सुद्धा यश संपादन करेल असे आश्वस्त केले.
आयोजित कार्यक्रमाला आ. प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार वामनराव चटप, प्रफुल मानकर, टिकाराम कोंगरे, नरेंद्र ठाकरे, वसंतराव घुईखेडकर, वंदना आवारी, संजय देरकर, प्रदिप बोनगिरवार, अरुणा खंडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी मंदिरात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगनाथस्वामी अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे, श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्ष संगीता संजय खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार