● आक्रमक आंदोलनाची रणनीती
● मनसे तालुकाध्यक्षांचे निवेदन
परिसरातील बहुतांश रस्ते खड्डयात गेले आहे. स्थानिकांना होणारा त्रास प्रशासनाला दिसत नाही किंबहुना आंधळेपणाचे ढोंग करत असावे. निवेदने देऊन, आंदोलने करून प्रशासनाला जाग येत नसेल तर “तांडव” करावाच लागणार हे सत्य नाकारता येत नाही.

संबंधित विभागाची कार्यपद्धती अद्याप स्थानिक नागरिकांना कळलीच नाही. जे रस्ते खड्डयात गेले त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष तर करत नाही ना असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर जे रस्ते चांगले आहे त्यावर सिमेंटचा थर चढविण्यात येत आहे. एकाच रस्त्यावर दाटून आलेले प्रेम कशाचे द्योतक समजावे.
तालुक्यातील आबई फाटा ते ढाकोरी बोरी मार्गे जाणारा रस्ता चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याला जोडल्या जाणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा प्राप्त असून सुद्धा ह्या मार्गाची पूर्णपणे चाळण झालेली आहे. संपूर्ण रस्ता खड्डयात गेला आहे, या मार्गावरून वाहन चालवणे अवघड झाले असून लहानसहान अपघात नित्याचेच आहे.
गौण खनिजांच्या विपुल संपत्तीने परिपूर्ण असलेला हा भाग प्राथमिक सुविधांपासून मात्र नेहमी वंचित राहिलेला आहे. गौण खनिजात दगडी कोळसा, डोलामाईट्स, सिमेंट ची अवजड वाहनांतून वाहतूक होत असते. त्यामुळे या भागातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अन्यथा मनसे खड्डयात गेलेल्या रस्त्यासाठी तांडव करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी धनंजय त्रिंबके, फाल्गुन गोहोकार, प्रवीण डाहुले, राजू बोधाडकर, अरविंद राजूरकर, अनिल गौरकार, पद्माकर मालेकर, सागर काळे, अमर पचकटे, यश घोटकर, सौरभ चिडे, विपीन खंडळकर, प्रफुल्ल पेन्दोर, शैलेश मेश्राम, विक्रम चिडे, शंकर आवारी, सचिन आवारी, प्रितम राजगडे, गोवर्धन पिदुरकर, दिलीप सोनटक्के, निखील मालेकर, प्रवीण बोरकर, नयन चिव्हाणे, तुळशीराम बोरकर, विशाल मालेकर, सागर येडे, प्रकाश पुंडकर, अनिल ताजने, संदीप मेश्राम, मंगेश टेकाम, निलेश ठावरी, मोरेश्वर ननकाटे, मिथुन बोंढे, प्रकाश कोंडेकर यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार