● मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची डागडुजी
शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. ठिक ठिकाणी खड्डये पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्या रस्त्याबाबत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ने निवेदन देत तात्काळ रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली होती. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी तात्काळ दखल घेत शनिवारी रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले.

व्यापारी आघाडीने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. नगराध्यक्ष ‘इन्स्टंट’ ऍक्शन मोडवर येत बाजारातील तुटी कमान ते मोठी कमान पर्यंतचा रोड पर्यंत कामाला सुरवात केली.
जनतेच्या सेवेसाठी मी सदैव सोबत
वणीतील मुख्य गांधी चौकातील वाढलेले खड्डे पाहता रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक अडचण निर्माण होत होती दरम्यान व्यापारी आघाडीचे निवेदन प्राप्त झाले. लगेचच मुख्य चौकातील रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. जनतेच्या सेवेसाठी मी सदैव सोबत असल्याची ग्वाही दिली.
तारेंद्र बोर्डे
नगराध्यक्ष, वणी
येणारे सर्व सण नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी निमित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तसेच नवरात्रीमध्ये सर्व देवींच्या विसर्जनासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे गालबोट व अपघाताच्या शक्यता बळावल्या होत्या, तरी कोणतीही अनुचित घटना घडण्याआधीच रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार