● आडकोली शेतशिवारातील घटना
मुकुटबन- जामणी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या ‘आडकोली’ गावालगतच्या शेतशिवारात दि. 19 सप्टेंबर ला पट्टेदार वाघाने गायीवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना सोमवारी उघडीस आली. पट्टेदार वाघाच्या मुक्तसंचारामुळे आडकोली परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आडकोली वनवर्तुळात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर बिनधास्त सुरू आहे. तर शेतशिवारात शेतीकाम करणाऱ्या शेतीकऱ्यांना व जंगलात चराईसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या गुराख्याना मुक्तसंचार करणाऱ्या पट्टेदार वाघाचे दर्शन दररोज होत आहेत. या दरम्यान 19 सप्टेंबर ला सायंकाळी 06 :30 वाजताचे सुमारास शेतकरी ‘सुहास दादाजी नांदेकर’ यांच्या मालकीच्या गीर जातीच्या गायी, गुराखी शेतातील धुऱ्यावर चारत असतांना, कळपातील गीर जातीची एक गाय आढळून आली नाहीत. गुराख्याने सतर्कतेने गायीचा शोध घेतला असता, शेतालगत जंगलात गाय मृतावस्थेत दिसली. गायीला वाघाने ठार केल्याचा कयास लावत गुराख्याने शेतमालकाला याची माहिती दिली.
पट्टेदार वाघाने गायीला ठार केल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. गीर जातीची गाय ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आथिर्क नुकसान झाले आहेत. यांची नुकसान भरपाई देण्याच्या मागणी सह परिसरात मुक्त संचार करणाऱ्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्तात करावा अशी मागणी करण्यात आली आहे.