Home वणी परिसर मनसेच्या तालुकाध्यक्षपदी फाल्गुन गोहोकार

मनसेच्या तालुकाध्यक्षपदी फाल्गुन गोहोकार

411

*उपाध्यक्ष प्रवीण डाहुले तर विधानसभा निरीक्षक उमेश वैरागडे 

Img 20250422 wa0027

वणी बातमीदार: अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहुतांश राजकीय पक्ष संघटनात्मक बांधणी करताहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी वणी तालुकाध्यक्षपदी फाल्गुन गोहोकार तर वणी विधानसभा निरीक्षक पदावर उमेश वैरागडे  यांची निवड केली आहे.

Img 20250103 Wa0009

विदर्भात वणी विधानसभा क्षेत्र मनसेचा गढ मानला जातो. पक्षात खंदे युवा कार्यकर्ते आहेत तर तरुणाईचा जोश मनसेची ताकत असल्याचे दिसून येत आहे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाने आपली संघटना मोर्चेबांधणी सुरू केली असताना यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील नेत्यांनी राज्यपातळी ते शाखा पातळीपर्यंत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी व दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवून, येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला यश संपादनाच्या दिशेने नेत तळागाळातील  सर्व लोकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध राहील.

 फाल्गुन गोहोकार , वणी तालुकाध्यक्ष मनसे 

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा निरीक्षक पदी उमेश वैरागडे तर वणी तालुक्याची जबाबदारी युवा मनसैनिक फाल्गुन गोहोकार यांच्याकडे देण्यात आली असून तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण डाहुले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीने सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

 

Previous articleआरोपीच्या शोधासाठी पोलिसांची ‘दमछाक’
Next articleइसमाची गळफास घेऊन आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.