Home वणी परिसर मुख्याधिकारी व अभियंत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा !

मुख्याधिकारी व अभियंत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा !

* स्वातंत्र्य दिनापासून घंटानाद आंदोलन

मारेगाव : दीपक डोहणे- मारेगाव नगरपंचायतचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कार्यालयात कायम विसावलेल्या कंत्राटदारावर येथील मुख्याधिकारी व अभियंता कमालीचे मेहेरबान आहेत. शहर विकासाच्या नावावर खेळखंडोबा सुरू असल्याचं सकृतदर्शनी दिसत असून ‘एका’ कामात भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचा आरोप करत सखोल चौकशीअंती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वातंत्र दिना पासून घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

शहराच्या प्रभाग क्रमांक 8 मधील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम थातुरमातुर करण्यात आले. अतिक्रमण धारकांना पाठीशी घालून अंदाजपत्रका नुसार काम न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रभाग वासीयांचा आहे. त्यामुळे सदर कामाची गुणवत्ता चाचणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

शहराच्या विविध भागात नागरी सुविधा अंतर्गत रस्त्याच्या कामाचा धडाका सुरू आहे. अनेक सिमेंट रस्त्याची अवघ्या दोन तीन महिन्यात चाळणी झाली आहे. त्यामुळे कामात किती पारदर्शकता आहे हे दिसून येत आहे. नगरपंचायत कार्यालयाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरच विकास कामाच्या थातुरमातुर धडाक्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहे.

Img 20250103 Wa0009

नगरपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ देणाऱ्या कंत्राटदाराने सलगी वाढवत मुख्याधिकारी व अभियंता यांनी आपलेही इप्सित साध्य करीत विकासाच्या नावावर मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा चालविला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 8 सह इतर प्रभागातील कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून चौकशी व्हावी याकरिता येत्या स्वातंत्र्य दिनी नगरपंचायत कार्यालय समोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

घंटानाद आंदोलनाचे नेतृत्व गजानन चंदनखेडे, शब्बीर खान पठाण, मारोती देवाळकर, विनोद बदकी, बंडू मत्ते, दिनेश सरवर, राजू बदकी, मनोज पेंदोर यांचेसह येथील नागरिक करणार आहे. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा एल्गार येथील ग्रामस्थांनी पुकारला आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.