59 ग्रामपंचायती मधून 17 लाखाची कर वसुली

वणी बातमीदार: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व्ही. पी. पाटकर यांच्या मार्गदर्शनात रविवार दि. 1 ऑगस्ट ला दिवाणी व फौजदारी न्यायालय, वणी येथे “राष्ट्रीय लोक न्यायालयाचे” आयोजन करण्यात आले होते. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष के.के. चाफले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आयोजित लोक अदालतीत सह-दिवाणी न्यायाधिश एस.एम. बोमीडवार, दुसरे सह-दिवाणी न्यायाधिश पी.सी. बछले, बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. श्री. व्ही. कावडे, गट विकास अधिकारी राजेश गायनर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकन्यायालयामध्ये एकुण दोन पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. सह-दिवाणी न्यायाधीश एस. एम. बोमीडवार हे विशेष मोहिमे अंतर्गत निकाली काढण्याकरीता ठेवण्यात आलेल्या प्रकरणाचे पॅनल प्रमुख होते. लोकन्यायालयामध्ये वादपुर्व प्रकरणे तसेच या न्यायालयातील प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी 398 वादपूर्व प्रकरणे, 05 दिवाणी प्रकरणे व 124 फौजदारीची प्रकरणे तडजोडीने निपटारा करण्यात आले. विशेष मोहिमे अंतर्गत 02 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरण मिळुन एकुण दंड रुपये 51 लाख 20 हजार 259 रुपये दंड वसुल करण्यात आला.
लोकन्यायालयाच्या यशस्वीते करीता न्यायालयाचे सहायक अधिक्षक पी.बी. जाधव, तालुका विधी सेवा समिती चे कर्मचारी एम. व्ही. जुमनाके, वरिष्ठ लिपीक, एस. एस. निमकर, कनिष्ठ लिपीक एम. व्ही. हागरे, पैरवी अधिकारी शिरपूर चे ए एस आय. अशोक स्वामी, कोर्ट मोहरर सुनील कुंटावार यांचेसह शिपाई तसेच न्यायालयीन कर्मचारी, वकील मंडळी यांनी सहकार्य केले.