● औचित्य चोरडीया यांच्या वाढदिवसाचे
Wani News | भाजपा नेते व सामाजीक कार्यकर्ते विजयबाबु चोरडीया यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. संपुर्ण सप्ताहभर ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती’च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑगष्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत नेञ चिकित्सा व मोती बिंदू शस्ञक्रिया शिबीर तर 3 ते 5 सप्टेंबरला विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. BJP leader and social activist Vijaybabu Chordia’s birthday is being celebrated with great fanfare.
धवल नेञालय नागपुर यांच्या सहकार्याने नेञ चिकित्सा व मोती बिंदू शस्ञक्रिया शिबीर सुविधा मंगल कार्यालय मारेगांव येथे पार पडले. याप्रंसगी 600 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 125 रुग्णांवर 2 सप्टेंबरला मोतीबिंदु शस्ञक्रिया करण्यात येणार आहे. तसेच कोळी समाज भवन, कायर व जैताई मदिरात नेञ चिकित्सा व मोती बिंदू शस्ञक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लहान मुलांकरीता विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव महिला समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये बालकृष्ण दर्शन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, कृष्ण झुला, कृष्ण मटकी, राधा चुनरी, डोळयावर पटटी बांधुन मटकी फोडणे, हौजी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोबतच धार्मीक व देशभक्तीपर डान्स स्पर्धा आणि कपडे, ज्वेलरी, पर्स, अॅसेसरीज याची प्रदर्शनी होणार आहे.
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयबाबु चोरडीया यांचा 4 सप्टेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्ताने गोशाळा दर्शन, गोमाता पुजन व चारा अर्पण करण्यात येणार असुन विशेष आकर्षण शहनाज अख्तर यांची सायंकाळी शासकीय मैदानावर होणारी भजनसंध्या असणार आहे. तसेच 5 सप्टेंबरला सुध्दा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
Rokhthok News






