Home वणी परिसर बाजार समितीत आमदार बोदकुरवार यांच्या ‘रणनीती’ चा ‘विजय’

बाजार समितीत आमदार बोदकुरवार यांच्या ‘रणनीती’ चा ‘विजय’

● सभापती ऍड. एकरे तर उप सभापती गारघाटे

1952

सभापती ऍड. एकरे तर उप सभापती गारघाटे

Apmc news| वणी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या 18 संचालक पदा करिता पार पडलेल्या निवडणुकीत
आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या शेतकरी एकता पॅनलने 14 जागेवर दणदणीत विजय मिळवला. मागील कालखंडात झालेला दगा फटका यावेळी होवू नये यासाठी त्यांनी आखलेली  रणनीती यावेळी सफल झालेली असली तरी “शब्द” काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. While it seems that the  apmc election will be conditional. Bodkurwar’s group won unilaterally.

Img 20250422 wa0027

बाजार समितीच्या निवडणुका लागल्या, सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीवर ताबा मिळावा याकरिता रणनीती आखली. भारतीय जनता पार्टी ला एकटं पडायचं असं विरोधकांनी ठरवलं होतं. महाविकास आघाडीने कडवं आव्हान उभे केले होते. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेत्याला आपल्या गटात खेचत सभापती पदाचा ‘शब्द’ दिला.

Img 20250103 Wa0009

वणी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आ. बोदकुरवार व ऍड. विनायक एकरे यांच्या नेतृत्वातील शेतकरी एकता पॅनल व माजी आमदार वामनराव कासावार, विश्वास नांदेकर यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये चुरशीची लढत झाली.

बाजार समितीची निवडणूक अटीतटी ची होईल असे वाटत असतानाच आ. बोदकुरवार यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवला. बाजार समितीत 18 पैकी 14 उमेदवार निवडून आणले. सत्ता केंद्रित राजकारणात विचारधारेला महत्व नसतं. यामुळेच बाजार समितीचे सभापती म्हणून ऍड. विनायक एकरे यांची वर्णी लागली तर भाजपच्या विजय गारघाटे यांना उप सभापती पदी निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या शेतकरी एकता पॅनल चे ऍड. विनायक एकरे, नितीन पानघाटे, प्रभाकर बोढे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर, अशोक पिदूरकर, वेणूदास काळे, मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर, विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार हे बाजार समितीत निवडून आलेले आहेत. यामुळे आ. बोदकुरवार यांनी आपला “व्हीटो” पॉवर वापरत निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
Rokhthok News

Previous articleस्टोव्हचा भडका, वृद्ध महिला मृत
Next articleदुःखद….. विष प्राशन करुन संपवले जीवन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.