Home वणी परिसर वेकोलीचे मानवनिर्मीत ढिगारे नैसर्गीक आपत्‍तीला कारणीभुत

वेकोलीचे मानवनिर्मीत ढिगारे नैसर्गीक आपत्‍तीला कारणीभुत

उकणी उपक्षेत्रामुळे पिपंळगाव व जुनाड येथील नागरीकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असुन....

Img 20250910 wa0005

सरपंचाने दिले SDO यांना निवेदन

Wani News | कोल इंडीयाच्‍या अधिनस्‍त वेस्टर्न कोलफिल्‍ड लिमीटेड (wcl) व्‍दारा वणी परीसरात कोळसा खाणी आहे. बहुतांश कोळसा खाणीमुळे विविध समस्‍या निर्माण झाल्‍या आहे. उकणी उपक्षेत्रामुळे पिपंळगाव व जुनाड येथील नागरीकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असुन मानव निर्मीत समस्‍या तात्‍काळ सोडवाव्‍या अशी मागणी पिपंळगाव ग्रामपंचायतचे सरपंच दिपक मत्‍ते यांली उपविभागीय अधिकरी (SDO) यांना दिलेल्‍या निवेदनातुन केली आहे. Western Coalfields Limited (wcl), a subsidiary of Coal India, has a coal mine in the wani area. Most coal mines have created various problems.

Img 20250103 Wa0009

उकणी खदानीच्‍या विस्‍तारीकरणात पिपंळगाव येथील 90 टक्‍के जमिन अधिग्रहण केली आहे. त्‍यामुळे पिपंळगाव ते उकणी हा जिल्‍हा परीषदेच्‍या मालकीचा सार्वजनिक रस्‍ता वेकोली प्रशासनाने डम्‍पींग करीता बंद केला. तर पर्यायी रस्‍ता निर्माण करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. रस्‍ता बंद करण्‍यात आल्‍यामुळे उकणी येथे जाणारे विद्यार्थी, रूग्‍ण व दैनंदिन कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वेकोली प्रशासनाने गावाच्‍या तिन्ही बाजुने ओबी (OB) डम्‍पींग केले. तर चौथ्‍या बाजुने तब्‍बल पंचविस फुट उंचीचा रस्‍ता केल्‍यामुळे मागील वर्षी पावसाळयात परीसरातील पिपंळगाव व जुनाड गावाच्‍या सभोताल पाणी साचले होते. यामुळे दोन्‍ही गावांचा संपर्क तुटला होता. भविष्‍यात मोठा महापुर आल्‍यास नागरीकांना जलसमाधी मिळेल अशी शंका निवेदनातुन व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

पिंपळगाव, जुनाड व बोरगाव येथील नागरीकांच्‍या जीवन मरणाचा प्रश्‍न उपस्थित करण्‍यात आला असुन वर्धा नदीच्‍या नैसर्गीक आपत्‍तीला वेकोलीचे मानव निर्मीत ढिगारे कारणीभुत असल्‍याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे तिन्ही गावातील महत्‍वपुर्ण समस्‍या निकाली काढण्‍यासाठी वेकोली प्रशासनासोबत महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या बैठक घ्‍यावी अशी मागणी निवेदनातुन करण्‍यात आली आहे.
Rokhthok News