Home वणी परिसर ती…अनामत रक्‍कम व्‍याजासह परत करा…!

ती…अनामत रक्‍कम व्‍याजासह परत करा…!

● पालीकेच्‍या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्‍ह

806

पालीकेच्‍या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्‍ह

Municipality News :रोखठोक | पालीकेच्‍या गाळे लिलाव प्रकरणी चार महिन्‍यापुर्वी दिड लाख रुपये अनामत रक्‍कम भरण्‍यात आली होती. परंतु अद्याप गाळयांचा लिलाव करण्‍यात आला नाही. यामुळे ञस्‍त झालेल्‍या नागरीकांने नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी यांना निवेदन देत ती… अनामत रक्‍कम व्‍याजासह परत करावी अशी मागणी केली आहे. 1.5 lakh rupees deposited in the municipal fund in the form of deposit should be returned with interest.

Img 20250422 wa0027

वणी नगर परिषदेचे आरक्षण क्रमांक 19 अ व 19 ब मधील गाळे लिलावात भाग घेण्‍यासाठी ब्लॉक नं. 19 अ 222 ब व 225 अ करीता उमेश दुलिचंदजी पोद्दार यांनी रितसर अर्ज केला होता. तर दिड लाख रुपये अनामत रक्‍कम पालीकेच्‍या फंडात भरलेली होती. बराच कालावधी लोटून गेला तरी लिलाव प्रक्रिया सुरु करण्‍यात आली नाही.

Img 20250103 Wa0009

उमेश पोद्दार यांनी मुख्‍याधिकारी यांना निवेदन देत, एक तर लिलाव प्रक्रिया सुरु करण्‍याची मागणी केली आहे. अन्‍यथा चार महिन्‍यापासुन पालीकेच्‍या फंडात अनामत रक्‍कम स्‍वरुपात जमा असलेले दिड लाख रुपये व्‍याजासह परत करावे असा पाविञा घेतला आहे. यामुळे पालीका प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार