Home वणी परिसर MNS aggressive… वेकोली प्रशासन नमले

MNS aggressive… वेकोली प्रशासन नमले

● विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला

504

विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला

MNS News Wani | वेकोलीच्या अडमुठेपणाचा फटका स्थानिक नागरिकांसह आता विद्यार्थ्यांना बसायला लागला आहे. त्रस्त नागरिकांनी मनसेचे नेते राजू उंबरकर यांना आपली व्यथा सांगितली आणि आक्रमक महाराष्ट्र सैनिकांनी वेकोली प्रशासनाला इंगा दाखवताच विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटला. Aggrieved citizens expressed their grief to MNS leader Raju Umbarkar

Img 20250422 wa0027

c1_20231005_07514075

वेकोली प्रकल्पबाधित क्षेत्रात येत असलेल्या गावातील मूलभूत सोयी-सुविधा सोडविण्याची जबाबदारी वेकोली प्रशासनाची आहे. कोलार खुल्या खदानी अंतर्गत निळापुर, ब्राह्मणी, कोलार- पिंपरी व बोरगाव ही गावे बाधित क्षेत्रातील आहेत. त्यामुळे या गावांतील विकासाची कामे करण्याचे व इतर सुविधा देण्याचे काम हे वेकोली प्रशासनाचे आहे.

Img 20250103 Wa0009

प्रकल्प बाधित गावातील शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी वणी येथील शाळा- महाविद्यालयात शिकतात. त्यांना ये-जा करण्यासाठी वेकोलीच्या माध्यमातून बससेवा पुरविण्यात येत होती. बेजबाबदार प्रशासनाने ती बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण वेकोलीने अवलंबले.

c1_20231005_07511649

विद्यार्थ्याना या बसचा लाभ मिळावा याकरिता येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या या रास्त मागणीला तात्काळ प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व सहकाऱ्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र सैनिकांनी ग्रामस्थांसह दिनांक 3 ऑक्टोबर ला रास्तारोको करत वेकोलीची वाहतूक ठप्प पाडली. पूर्वी वेकोली प्रशासनाकडून सुरू असलेल्या दोन्ही बस पूर्ववत सुरू कराव्या ही मागणी रेटून धरण्यात आली. वेकोली प्रशासनाने दाखल घेत सद्यस्थितीत एक बस चालु करुन पुढील दहा दिवसात दुसरी बस चालु करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, लक्की सोमकुंवर, राजू काळे, गोवर्धन पिदुरकर, सूरज काकडे, शिरीष भावरे, प्रविण कळसकर, अनंता डाखरे, योगेश काळे, जयश्री उपरे, विद्या शेंडे, अमृता बांगडे, शोभा चामाटे, पोर्णिमा खामनकर, छबूताई खामनकर, सविता मत्ते,अर्चना डाखरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News