Home Breaking News कोण उधळणार विजयाचा गुलाल…!

कोण उधळणार विजयाचा गुलाल…!

● विजयाचे गणित जुळवतांना संभ्रम ● समर्थक माञ पैज लावण्‍यात मग्‍न

1497
C1 20240502 19522140

विजयाचे गणित जुळवतांना संभ्रम
समर्थक माञ पैज लावण्‍यात मग्‍न

सुनील पाटील, वणी : चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्‍या टप्‍प्‍यात पार पडली आहे. मतदान शांततेत पार पडल्‍याने कार्यकर्ते,  पदाधिकारी व उमेदवार धावपळीतून मुक्त झाले आहे. विजयाचे गणित जुळवतांना उमेदवार संभ्रमात सापडलेला असतांनाच समर्थक माञ पैज लावण्‍यात मग्‍न असल्‍याचे दिसत असुन कोण उधळणार विजयाचा गुलाल हे 4 जुनलाच स्‍पष्‍ट होणार आहे. Election of Chandrapur-Wani-Arni Lok Sabha Constituency was conducted in the first phase

चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणुक सुरूवातीपासूनच खास ठरली. संसदेत जाण्‍यासाठी दोन्‍ही राष्‍ट्रीय पक्षाने नवखे उमेदवार रिंगणात उतरवले. संसदेचा दांडगा अनुभव पाठीशी व लोकसभा मतदार संघात प्रचंड जनसंपर्क असलेल्‍या माजी केंद्रीय गृह राज्‍यमंञी हंसराज अहिर यांचा भाजपाने पत्‍ता कट केला. याची झळ भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना बसेल का ? हे मत मोजणीअंती स्‍पष्‍ट होणार आहे.

कॉग्रेस पक्षाने दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्‍या पत्‍नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी बहाल केली तर भाजपाने राज्‍यातील भारदस्‍त नेते, मंञी सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवले. निवडणुक अटीतटीची होईल असे सुरवातीला वाटत असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेत मुनगंटीवार यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यांने खळबळ उडवून दिली. ग्रामीण भागात याचे चांगलेच पडसाद उमटले तर मतदारांत नाराजीचा सुर सर्वञ दिसुन आला.

चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघात मुनगंटीवार यांचे पेक्षा राजकीयदृष्‍टया दुबळया वाटणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांनी प्रचारात अचानक आघाडी घेतल्‍याचे दिसले. जातीय समिकरण, सत्ताधाऱ्याबाबत शेतकऱ्यांत ऊफाळणारा रोष, जनतेनेच हातात घेतलेली निवडणुक प्रकर्शाने जाणवत होती. समाज माध्‍यमातुन सत्ताधाऱ्यावर होत असलेली आगपाखड काठावरील मतदारांना मतदानासाठी चालना देणारी ठरली.

लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. तीन विधानसभा त्यांच्याजवळ असून बल्लारपूर विधानसभेचे नेतृत्व करणारे मुनगंटीवार हेच लोकसभेचे उमेदवार आहेत. सर्वच विधानसभा क्षेत्रात संघटनात्‍मक बांधणी सोबतच भाजपाने बुथ लेवल पर्यंत कार्यकर्त्‍यांची फळी निर्माण केली आहे. राज्‍य व केंद्र शासनाने केलेल्‍या विकास कामाचा अजेंडाच कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी मतदारापर्यंत पोहचवल्याचे या निवडणुकीत जाणवले नाही.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाच्या चर्चा सुरू झाल्या आहे. त्यात दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहे. मात्र करण्यात आलेले हे दावे प्रत्यक्षात उतरणार की, नाही यासाठी उमेदवारांकडून जय-पराजयाचे गणीत जुळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसत आहे. समर्थक मात्र आपणच विजयी होणार असल्याचा दावा करत असून पैज लावण्यात मग्न आहेत. कोण उधळणार विजयाचा गुलाल हे मात्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News