Home Breaking News crime: पाचशेच्या बनावट नोटा, तिघे ताब्यात

crime: पाचशेच्या बनावट नोटा, तिघे ताब्यात

● LCB..स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

886
C1 20240404 14205351

LCB..स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

crime news pusad: पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अलगद ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी राञी पुसद तालुक्यातील मारवाडी फाटा परिसरात करण्यात आली. यावेळी 4 लाख 82 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या तर दुचाकी व आरोपीला ताब्यात घेण्यात आले. A team of the local crime branch arrested the accused who was trying to circulate fake notes of five hundred rupees.

विशाल नागोराव पवार (34) खामनवाडी, कासोळा ता. महागांव ह.मु. धनराज फर्नीचर गांधीनगर, पुसद असे आरोपींचे नांव असुन संशयीत असलेले विनोद गंगाराम राठोड (42) रा. सुभाषवार्ड पुसद, बालु बाबुराव कांबळे (46) रा. परळी वैजनाथ जि. बिड यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

असली भारतीय चलन असलेल्या पाचशे रुपये नोटांच्या बदल्यात पाच पट बनावट नोटा देवून चलनात आणण्याचा प्रयत्न होत असल्याची ‘टिप’ गोपनिय माहितगाराने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदिप परदेशी यांना दिली. आरोपी गुरुवारी राञी दुचाकीने मारवाडी फाटा यामार्गाने वाशीम वरून पुसद येथे येणार असल्याचे सांगीतले. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी संबधीतांवर कारवाई करण्यााचे आदेश दिले होते.

पुसद वाशीम मार्गावर गुरुवारी राञी नाकाबंदी करण्यात आली यावेळी संशयीत दुचाकी क्रमांक MH-29-BY- 8637 ला थांबविण्यात आले. पोलीसांनी दुचाकीस्वार विशाल पवार याची कसुन चौकशी केली असता त्याचे जवळ पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. तसेच त्याच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्याचे जवळ बाळगून असलेल्या 500 रुपयांच्या 964 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तब्बल 4 लाख 82 हजाराचे बनावटी चलन व 60 हजार रुपये किंमती ची हिरो डेस्टीनी मोपेड दुचाकी जप्त करत आरोपीविरुद्ध भादवि कलम 489 (ब) (क). 120 (ब), 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस स्टेशन खंडाळा हे करित आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड (dr. Pavan bansod), अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप (piyush jagtap )यांचे मार्गदर्शनात SDPO पंकज अतुलकर, LCB PI प्रदीप परदेशी, PI अमोल सांगळे, PSI सागर भारस्कर, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, मोहम्मद ताज, सुनिल पंडागळे, दिगांबर गिते यांनी केली.
Rokhthok News