Home Breaking News दुचाकीची जबर धडक, महिला ठार

दुचाकीची जबर धडक, महिला ठार

● पुनवट जवळील घटना

2255
Image Search 1713628199115

पुनवट जवळील घटना

Sad News |सायंकाळी शौचास जाताना महामार्ग ओलांडणाऱ्या 32 वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने जबर धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुनवट येथे शनिवार दिनांक 20 एप्रिल ला 7:30 वाजता घडली. The woman was hit by a speeding bike.

योगिता अनिल सूर (32) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह तालुक्यातील पुनवट येथे वास्तव्यास होती. सायंकाळी ती शौचास जात असताना भरधाव वेगात असलेल्या दुचाकी क्रमांक MH-29-AP- 1965 जबर धडक दिली.

घटना घडताच स्थानिकांनी गर्दी केली, गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले. वाटेतच तिचा मृत्यू झाला, तिच्या पश्चात पती, एक मुलगा व मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले आहे.
Rokhthok News