Home Breaking News चक्‍क… पशुधनावर अनैसर्गिक कृत्‍याचा प्रयत्‍न

चक्‍क… पशुधनावर अनैसर्गिक कृत्‍याचा प्रयत्‍न

● धक्‍कादायक, विकृतीने गाठला कळस

2948
Img 20240613 Wa0015

धक्‍कादायक, विकृतीने गाठला कळस

Wani News | तालुक्‍यातील रासा शिवारात आज पहाटे धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. दिनांक 6 जुलैला पहाटे 3 वाजताच्‍या दरम्‍यान 38 वर्षीय व्‍यक्‍तीला चक्‍क पशुधनावर अनैसर्गिक कृत्‍याचा प्रयत्‍न करतांना रंगेहात पकडण्‍यात आल्‍याने चांगलीच खळबळ माजली असुन पोलीसात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. Caught red-handed while attempting an unnatural act

आनंद भुरु टेकाम (38) असे वासनेच्‍या आहारी गेलेल्‍या विकृतांचे नांव आहे. तो अंनतपुर (सुर्ला) येथील निवासी असुन हल्‍ली मुक्‍काम रासा येथे आहे. कामवासनेने पिडीत असलेल्‍या त्या विकृतांने आपली वासना क्षमविण्‍यासाठी पशुधनावर अनैसर्गिक कृत्‍य करण्‍याचा प्रयत्‍न केला माञ त्‍याला तत्‍पुर्वीच अटकाव करण्‍यात आल्‍याने त्‍याचा प्रयत्‍न हाणुन पाडला आहे.

समाजमाध्‍यम आणि पॉर्नफिल्‍म व्‍यक्‍तीला कोणत्‍याही थराला घेवून जात असल्‍याचे दिसत आहे. कामवासना चेतविण्‍याचे काम मोबाईलच्‍या माध्‍यमातुन सहज सोपे झाले आहे. युवक, तरुण व इसम यामुळे वाममार्गाला लागत असल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे. तालुक्‍यातील रासा येथे घडलेल्‍या प्रकारामुळे पशुधन सुध्‍दा सुरक्षीत नसल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.
Rokhthok News

C1 20240529 15445424