Home Breaking News SDO क्रोधीत, कोलडेपो धारकांना खडसावले..!

SDO क्रोधीत, कोलडेपो धारकांना खडसावले..!

603

नियमबाह्य होतेय कोळशाची वाहतूक
नियमांचे पालन करा अन्यथा..

यवतमाळ मार्गावरील कोलडेपोत होणारे कोळशाचे दळणवळण आणि शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची सातत्याने होणारी पायमल्ली लक्षात येताच उप विभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे क्रोधीत झाले. तात्काळ कोलडेपो धारकांची बैठक घेत नियमांचे पालन करा अन्यथा…कारवाईला सामोरे जावे लागेल असे खडसावल्याचे वृत्त आहे.

यवतमाळ मार्गावरील चिखलगाव हद्दीत मागील अनेक वर्षांपासून कोलडेपो थाटण्यात आले आहेत. कोळसा डेपो (वखार) येथे कोळसा खाणीतून कोळसा आणण्यात येऊन त्याची तात्पुरती साठवणुक व पुढे विविध ग्राहकांना विकण्यात येते.

यवतमाळ रस्त्याच्या दोन्ही बाजुस मोठया प्रमाणात कोलडेपो असल्याने कोळसा वाहतुकीच्या वाहनांची गर्दी व वाहतुकीस अडथळा होतो. वाहनाच्या हालचालीमुळे मोठया प्रमाणात धुळ निर्माण होऊन प्रदूषणात होणारी वाढ चिंताजनक आहे. त्याप्रमाणेच अवजड वाहनातून कोळशाचे होणारे दळणवळण आणि कोळशाचे मोठे ढेले रस्त्यामध्ये पडल्यामुळे होणारे अपघात सर्वश्रुत आहे.

कोलडेपो धारकांसाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. धूळ निर्माण होऊ नये याकरिता दररोज किमान तीन वेळा कोळशावर पाणी टाकणे, कोळसा वाहतूक करतांना तो पूर्णतः योग्य रितीने ताडपत्रीने झाकुनच त्याची वाहतूक करणे आणि वाहतूकीचे सर्व नियम कोळसाडेपो धारक व वाहतूकदार हयांनी काटेकोरपणे पाळावेत असे अभिप्रेत आहे मात्र तसे होताना दिसत नाही.

उप विभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी कोलडेपो मुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेत कोलडेपो धारकांची शुक्रवार दि. 10 डिसेंबर ला आपल्या कक्षात बैठक घेतली. याप्रसंगी वाहतूक शाखेचे सपोनि मुकुंद कवाडे उपस्थित होते. कोलडेपोतील अनागोंदी, नियमबाह्य वाहतूक यामुळे कोलडेपो धारकांना चांगलीच तंबी दिली.

SDO डॉ. शरद जावळे चांगलेच संतापल्याने आता कोलडेपो धारक व वाहतूकदार आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणार का ? याकडे लक्ष लागले असून याचा प्रत्यय अवघ्या काही दिवसात येणार आहे. अन्यथा कोलडेपो धारक व वाहतुकदारांना कारवाईला सामोरे जावे लागेल हे निश्चित.
वणी: बातमीदार

Previous articleवाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Next articleअकरा गोवंशाची सुटका, तिघे तस्कर अटकेत
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.