Home Breaking News विधानसभा क्षेञातील तडफदार नेतृत्‍व

विधानसभा क्षेञातील तडफदार नेतृत्‍व

● संजय खाडे यांच्‍या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

280
C1 20240522 18233196
Img 20240613 Wa0015

संजय खाडे यांच्‍या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Political News | कॉग्रेसचे नेते, वसंत जिनिंगचे संचालक संजय खाडे यांच्‍या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 23 मे ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य,  शेतीविषयक उपक्रमांचा समावेश आहे. तरी स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. Sanjay Khade’s aggressive leadership in the assembly sector.

वणी विधानसभा क्षेञात सर्वसमावेशक  व सामाजीक उपक्रम राबविण्‍यात अग्रेसर असलेले संजय खाडे सर्वश्रृत आहे. नुकत्‍याच पार पडलेल्‍या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्‍या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्‍या प्रचारार्थ त्‍यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजुन काढल्‍याचे आपण बघीतले आहे. प्रत्‍येक गावखेडयात त्‍यांनी कॉर्नरसभा आणि प्रचारयंञणा अतिशय शिस्‍तबध्‍दरित्‍या राबवली आहे.

मतदारसंघातील नानाविध प्रश्‍नाला वाचा फोडण्‍याकरीता त्‍यांनी प्रशासनाला धारेवर धरत निवेदने दिली आहेत. वेकोलीचे प्रश्‍न असो की विजेचा प्रश्‍न त्‍यांनी कॉग्रेस कार्यकर्त्‍यांना सोबत घेत जन आंदोलनाची तयारी चालवली आहे. सर्वसामान्‍य नागरीकांना न्‍याय मिळावा याकरीता ते सातत्‍याने कार्यरत असल्‍याचे प्रकर्शाने दिसुन येत आहे.

वणी विधानसभा क्षेञात गुरुवारी संजय खाडे यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा करण्‍यात येत आहे. याप्रसंगी सकाळी 8 वाजता रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा व सत्कार समारंभ, 9 वाजता ग्रामीण रुग्‍णालयात फळ वाटप, 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, 12.30 वाजता भीमनाळा, घोन्सा येथे 1 वाजता. वणी येथे 2 वाजता तर 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. संध्‍याकाळी 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
Rokhthok News

C1 20240529 15445424