Home Breaking News नरेंद्र मोदींची सभा, व्यासपीठावर राजू उंबरकर..!

नरेंद्र मोदींची सभा, व्यासपीठावर राजू उंबरकर..!

● रामदास तडस यांचे प्रचारार्थ आज जाहीरसभा

1703
C1 20240419 12274531
रामदास तडस यांचे प्रचारार्थ आज जाहीरसभा

Political News | दुसऱ्या टप्‍प्‍यात होत असलेल्‍या लोकसभेच्‍या निवडणुकीचा झंझावती प्रचार सुरु आहे. शुक्रवारी वर्धा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचे प्रचारार्थ प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा तळेगांव येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता होणार असुन व्यासपीठावर पहिल्‍या रांगेत मनसे नेते राजु उंबरकर यांना स्‍थान मिळाले आहे. Umbarkar’s place on the dais in Narendra Modi’s meeting.

लोकशाहीच्‍या उत्‍सवाला आज दिनांक 19 एप्रील पासुन सुरुवात झाली आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यातील नागपुर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुर व रामटेक या पाच लोकसभेचे मतदान शांततेत होताहेत. दुसऱ्या टप्‍प्‍यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. तळेगाव येथे होत असलेल्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या सभेमुळे वर्धा, अमरावती व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात परिणाम होणार आहे.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील डॅशिंग नेतृत्‍व तसेच मनसे नेते राजु उंबरकर यांना पक्षाने विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे समन्‍वयक म्‍हणुन निवडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या होवू घातलेल्‍या सभेत व्‍यासपिठावर पहिल्‍या रांगेत उंबरकरांना स्‍थान मिळाले असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. व्‍यासपिठावरुन ते काय बोलणार याकडे लक्ष लागले असुन त्‍यांच्‍या “रोखठोक” भाषणाची उत्‍सुकता महाराष्‍ट्र सैनिकांना आहे.
Rokhthok News