Home Breaking News धमाल……समूह नृत्याचा नेत्रदीपक अविष्कार

धमाल……समूह नृत्याचा नेत्रदीपक अविष्कार

752
C1 20240404 14205351

नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित
प्रेस वेलफेअर असोसिएशनचे आयोजन

रोखठोक | दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रेस वेलफेअर असोसिएशनने आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. एसपीएम शाळेच्या प्रांगणात दि. 26 जानेवारीला सायंकाळी धमाल……समूह नृत्याचा नेत्रदीपक अविष्कार विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदानी अनुभवला.

आंतरशालेय समुह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे हस्ते पार पडले तर अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तारेंन्द्र बोर्डे, ठाणेदार प्रदीप शीरस्कर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक प्रेस वेलफेअर चे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले.

आयोजित स्पर्धेत येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचे नृत्य अव्वल ठरले त्यांनी 2023 चा फीरता करंडक पटकविला. तर या स्पर्धेत शहरातील 15 शाळांनी सहभाग घेतला होता. सर्वच सहभागी विद्यार्थ्यांनी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण नागपूरच्या नृत्यांगना सुचना बंगाले, प्रसिध्द नृत्यांगना आस्था देहेकर व लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांनी केले.

या स्पर्धेत ‘अ’ गटामधून विवेकानंद विद्यालयाने प्रथम क्रमांक, ब्लॅक डायमंड स्कुलने द्वितीय क्रमांक, तर जनता विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकविला. तर ‘ब’ गटातून आदर्श विद्यालयाने प्रथम क्रमांक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने द्वितीय क्रमांक तर जनता विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार बाळू धानोरकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी रंगनाथस्वामी अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन जगदीश ठावरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस वेलफेअरच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.
वणी: बातमीदार

Previous articleअठरा वर्षीय तरुणाने घेतला गळफास
Next articleदोन चोरटे गजाआड, पाच दुचाकी हस्तगत
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.