Home क्राईम पोलीसांनी आवळल्‍या दुचाकी चोरट्यांचा मुसक्‍या

पोलीसांनी आवळल्‍या दुचाकी चोरट्यांचा मुसक्‍या

● चार दुचाकी केल्‍या हस्‍तगत ● LCB व वणी पोलिसांची संयुक्त कारवाई

991
Img 20250630 wa0035

चार दुचाकी केल्‍या हस्‍तगत
LCB व वणी पोलिसांची संयुक्त कारवाई

Crime News Wani | शहर व तालुक्‍यात दुचाकी चोरींच्‍या घटनेत कमालीची वाढ झाली होती. पोलीसांनी तपासयंञणा कार्यान्वित केली माञ चोरट्यांचा छडा लागत नव्‍हता. वणी पोलीस व (LCB) स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकांने संयुक्‍तरित्‍या तपास आरंभला असता चंद्रपुर जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांच्या मुसक्‍या आवळल्‍या असुन चार मोटर सायकल हस्‍तगत करण्‍यात आल्‍या आहेत. A two-wheeler thief was arrested in Chandrapur district when the teams of Wani Police and Local Crime Branch (LCB) started a joint investigation.

Img 20250630 wa0037

नितीन उर्फ बिट्टु नत्थुजी मारबते (24) असे दुचाकी चोरटयाचे नाव असुन तो जिजामाता नगर,  नदाफाटा, कोरपना, जिल्‍हा चंद्रपुर येथील निवासी आहे. चोरीस गेलेली काळ्या रंगाची अॅक्टीव्हा मोपेड मोटार सायकल क्रमांक MH 34 BU 0343 ही त्‍यानेच चोरल्‍याची गोपनिय माहिती पोलीसांना प्राप्‍त झाली होती.

Img 20250103 Wa0009

ठाणेदार अजित जाधव यांनी त्वरीत एक पथक गठीत करुन आरोपीला ताब्‍यात घेण्‍याच्‍या सुचना निर्गमीत केल्‍या होत्‍या. त्‍या प्रमाणेच स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने सुध्‍दा आरोपींच्‍या मुसक्‍या आवळण्‍याची व्‍युहरचना आखली होती. आरोपी टप्यात येताच ताब्‍यात घेण्‍यात आले.

ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या दुचाकी चोरट्याला पोलीसी हिसका दाखवताच त्‍याने अन्‍य मोटर सायकली चोरल्‍याची कबुली दिली. त्‍याचे ताब्‍यातुन एक लाख रुपये किमतीच्‍या चार मोटर सायकली हस्‍तगत करण्‍यात आल्‍या आहेत.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे, LCB चे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा पथक वणी येथील सपानि अतुल मोहनकर पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसरे, विकास धडसे, सुधीर पांडे, शुभम सोनुले, सुनील जलगंटीवार, सागर सिडाम यांनी पार पाडली आहे.
Rokhthok News