Home राजकीय मेडीकल कोट्यात ओबीसींना आरक्षण

मेडीकल कोट्यात ओबीसींना आरक्षण

235

ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाला यश
वणी बातमीदार: ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना 27 टक्के आरक्षण व  ईडब्लुएस ला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गुरुवार दि. 29 जुलै ला केंद्र सरकारने लागु केला आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून होत असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हे मोठे यश असल्याचे ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. याचा लाभ राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना मेडीकलमधे प्रवेश मिळण्यासाठी होणार आहे. राज्यातील मेडीकल प्रवेशित ओबीसी विद्यार्थ्यांना युजी मधे 15 टक्के कोट्यात व पीजीमधे 50 टक्के कोट्यात 27 टक्के आरक्षण सत्र 2021-22 पासून मिळणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर यांनी या महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले आहे.