Home Breaking News त्या.. पत्नीचा टाहो, विषाची पुडी घेऊन गाठले वणी

त्या.. पत्नीचा टाहो, विषाची पुडी घेऊन गाठले वणी

3037

महामंडळाचे अधिकारी धमकी देत असल्याचा आरोप
कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचला

वणी: अवघ्या दोन महिन्यांपूर्वी यवतमाळ वरून वणी येथे वाहतूक नियंत्रक पदावर पदोन्नती झालेला कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचला आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी धमकी देत असल्याचा आरोप करीत त्याच्या पत्नीने मुलासह विषाची पुडी घेऊन वणी गाठले.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला जवळ जवळ दोन महिने पूर्ण होत आहे. योग्य तोडगा निघतांना दिसत नाही. निलंबन आणि बडतर्फीचे सत्र सुरू आहेत.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

अनिल विठ्ठल कपिले यांची पदोन्नती झाल्याने ते वाहतूक नियंत्रक म्हणून वणी आगार येथे रुजू झाले. त्यानंतर राज्य मार्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. ते सुध्दा संपात सहभागी झाले होते. मात्र कामावर रुजू व्हावे याकरिता अधिकारी धमक्या देत असल्याने ते depression मध्ये गेलेत.

कपिले यांचे वास्तव्य यवतमाळ ला असून ते सतत आत्महत्या करण्याची भाषा वापरत असल्याचे पत्नी अर्चना यांनी यावेळी सांगितले. तसेच नोकरी च्या कारकिर्दीत अनेक हालअपेष्टा सहन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातच आता अधिकारी देत असलेली धमक्या मुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली आहे.

पती मानसिकदृष्ट्या खचल्याने पत्नी अर्चना, मुलगा प्रथमेश व पती सह विषाची पुडी घेऊन तडक वणी येथील संपकऱ्यांचे उपोषण मंडप गाठले. तिचा टाहो मन विचलित करणारा होता.

अर्चनाने धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यां विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले असून परिवारातील कोणाच्याही जीवितास काही झाल्यास महामंडळाचे अधिकारी व शासन जबाबदार असेल असे त्यांनी सांगितले.
वणी: बातमीदार