Home क्राईम दबंग चोरट्यांचा प्रताप, प्रवाहित वीज तार लंपास

दबंग चोरट्यांचा प्रताप, प्रवाहित वीज तार लंपास

● महाराष्ट्र राज्य पारेषन कंपनीचे नुकसान

1051
C1 20231012 11191310

महाराष्ट्र राज्य पारेषन कंपनीचे नुकसान

Wani News | दबंग चोरटे आपल्या जीवाची पर्वा न करता चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. अति उच्चदाब वाहिनीचा चालू स्थितीतील विदयुत वाहक तार चोरट्यांनी लंपास केला. यामुळे महाराष्ट्र राज्य पारेषन कंपनीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी शिरपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. A case has been registered against the unknown thief in Shirpur police.

Img 20250601 wa0036

तालुक्यात चोरीच्या घटनेत होत असलेली वाढ चिंतनीय आहे. इझीमणी च्या नादात चोरटे धोकादायक कृत्य करत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अति उच्चदाब वाहिनीचा प्रवाहित वीज तार कापण्याचे धाडस चोरट्यांनी केल्याचे दिसून येत आहे.

Img 20250103 Wa0009

वरोरा-घुग्गूस वाहीनी बंद पडल्याची माहिती वाहीनी देखभाल उपविभाग वरोरा. जि. चंद्रपुर येथील अती कार्यकारी अभियंता मोहन भाऊराव वैद्य यांना मिळाली. सदर वाहीनीची पाहणी करण्याकरीता पथक रात्री 8 वाजता नायगाव शिवारात पोहचले असता नदीकडील भागामध्ये असलेल्या DP NO- 233 आणि Tower no-234-235 R फेजचा विद्युत वाहन तार अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याचे आढळले.

संबंधित वाहीनी 220 के. व्ही उपकेंद्र वरोरा येथुन शैबळ, कुचना, पाटाळा, वणी तालुक्यातील मंदर, चारगाव, पुरड, पुनवट, नायगाव, व 66 के व्ही घुग्गूस उपकेंद्र जाते. सदरवाहीनी चालु स्थितीत असताना अज्ञात चोरट्यांने वाहीणीच्या फेजचा तार कापुन लंपास केला. याबाबत दाखल तक्रारीअंती अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून ठाणेदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दुबे पुढील तपास करत आहे.
Rokhthok News